Thursday, August 25, 2022

Fertilizer Rate : शेतकऱ्यांची चिंता वाढणार ! खतांच्या किमतीत होणार मोठे बदल ?

 Fertilizer : शेतीसाठी खत हे अतिशय महत्वाचं असत. परंतु नैसर्गिक वायूंच्या (Natural Gas Prices) वाढत्या दरामुळे जर्मनीच्या BASF कंपनीने अमोनिया उत्पादनामध्ये (Ammonia Production) कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील वर्षात खतांच्या (Fertilizer Rate) दरामध्ये मोठया प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे. 


    BASF ही जर्मनीमधील कंपन्यांपैकी एक आहे ही जगातील सर्वात मोठी खत उत्पादक (Fertilizer Producer) कंपनी आहे. या कंपनीने नुकत्याच एका पत्रकार परिषदेत अमोनिया उत्पादनामध्ये  (Ammonia Production)  कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


    BASF चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, “अमोनिया उत्पादनासाठी (Ammonia Production)  मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायूची गरज असते. पण सध्या नैसर्गिक वायूंच्या (Natural Gas Prices) वाढत्या दरामुळे अमोनियाचे उत्पादन  (Ammonia Production) हे अतिशय खर्चिक झाले आहे. 


    त्यामुळे कंपनीने या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नैसर्गीक वायूंच्या वाढत्या दरामुळे खत उत्पादन (Fertilizer Producer) महाग होत आहे. त्याचा भार शेतकऱ्यांवर आता पडणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी खतांच्या (Fertilizer Rate) किमतीत मोठ्य प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी या वेळी सांगितलं आहे.


दर वाढण्याच कारण

    तर मग BASF या कंपनीच्या म्हणण्यानुसार, युरोपमध्ये अनेक ठिकाणी खत निर्मितीचे प्लांटस आहेत. त्या ठिकाणी अमोनिया उत्पादनासाठी (Ammonia Production) लागणाऱ्या नैसर्गिक वायूच्या (Natural Gas Prices)  दरामध्ये अतिशय मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. 


    त्यामुळे 2022 च्या दुसऱ्या महिन्यात नैसर्गिक वायूसाठी केलेल्या खर्चात 80 लाख युरोपियन पौंड्स इतकी वाढ झाली आहे. बरोबर रशियाच्या गॅझप्रॉमने जाहीर केलेल्या महिती नुसार, जर्मनी आणि इतर मध्य युरोपियन देशांना नॉड स्ट्रिम पाईपलाईनद्वारे जो गॅस पुरवला जातो त्यात रशिया 20% टक्क्यांची वाढ करणार आहे. 


    तसं पाहिलं तर जर्मनी हा देश रशियाकडून अंदाजे 55 % इतक्या प्रमाणात नैसर्गिक वायूंची आयात करतो. यातला बराचसा गॅस नॉडस्ट्रिम वन पाईपलाईनद्वारे पुरवला जातो. यारा इंटरनॅशनल या बहुराष्ट्रीय कंपनीनेही खत उत्पादनात वाढ करणार असल्याची घोषणा देखिल केली आहे.


खतांच्या किमती कशा कमी होतील

    तर मग हे जाणून घ्या जर शक्य झाले तर नैसर्गिक वायूला दुसरं पर्याय म्हणून या ठिकाणी इतर कोणताही ऊर्जा स्त्रोत जसं की इंधन किंवा तेलाचा वापर केला जाऊ शकतो का या वर देखिल विचार चालू आहे. 


    याच दरम्यान इतर पुरवठ्यातील फरक दूर करण्यासाठी काही पुरवठादारांकडून अमोनियाची खरेदी करता येते का या वार देखिल कंपनी लक्ष देता आहे. त्या बरोबर जर नैसर्गिक वायूच्या (Natural Gas Prices)  तुटवड्यामुळे जर्मन शासनाने आणीबाणी जाहीर केली तरी BASF कंपनीच्या लुडविगशाफेन या प्लांटवर उत्पादन सुरूच राहील असे देखिल कंपनीच्या वतीने या पत्रकार परिषदेत सांगण्यात आला आहे. 


    तसेच शासनाने जाहीर केलेल्या आणीबाणीचा परिणाम हा पुरवठ्यावर होऊ नये म्हणून इतर काही उत्पादक कंपन्यांनी देखील एकत्र येऊन भूमिका घेतली पाहिजे. जर्मन शासनाने जर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात आणीबाणीची घोषणा केली तर BASF उत्पादन च्या लुडविगशाफेन साइटवर  सुरूच राहील, अशी माहिती  BASF चे प्रमुख मार्टिन ब्रुडरमुलर यांनी सांगितली आहे.

No comments:

किसान उत्पादक संगठन

  farm producer organisation:  भारत के विकास में किसानों का महत्वपूर्ण स्थान है। कोरोना संकट में भी किसानों ने अर्थव्यवस्था को मजबूती प्रदान...